Thursday, March 25, 2010

आशयचा नवीन प्रताप !!


नुकताच आशय screw driver वापरायला शिकला. आता त्याचे सगळीकडे एकच लक्ष्य होते ते म्हणजे ज्या ज्या वस्तूंना screw ने जोडले आहे ते काढून परत लावून पाहायचे. बस्स !!! पहिला हल्लाबोल झाला तो त्याच्या खेळण्यातल्या Dumper वर, JCB वर आणि घोड्यावर ...
Dumper हे आशयचे अतिशय लाडके खेळणे असल्याने ते तो खूप चांगले निरखत असे. त्यामुळे तो परत त्याचे सर्व part जोडण्यात यशस्वी झाला. मग त्याने हल्ला केला JCB वर. JCB चे सर्व स्क्रू काढून ठेवून दिले. मग घोडा हाती घेतला. आम्हाला वाटले कि हे दोन्ही पण तो जोडून ठेवेल. पण तसे काहीच झाले नाही. उलट दोन्ही खेळण्यांचे छोटे छोटे भाग घरभर पसरले जाऊ लागले. आशय ने घोड्याच्या आतल्या motor पासून सर्व part सुटे केले होते. त्यामुळे ते जोडणे त्यालाच काय आम्हालाही शक्य नव्हते. शेवटी कंटाळून त्याने ते सगळे घोड्याचे आणि JCB चे पार्टस उचलून एका पिशवीत भरून ठेवले (बाबाने रागावून सर्व कचऱ्यात टाकायची धमकी दिल्यावर).
मग आशयची काकदृष्टी सगळीकडे फिरत फिरत स्वयंपाक घरात शिरली. मी gas च्या शेगडी वर काही तरी करत होते. बराच वेळ माझ्या बाजूला खुर्ची लावून त्यावर चढून आशय शांतपणे शेगडी कडे बघत होता. मला त्याचे निरीक्षण पाहून जरा आश्चर्य वाटले. मी त्याला विचारले काय बघत आहेस बेटा ? माझे त्याच्या कडे लक्ष आहे हे समजताच त्याने संधी न दवडता त्याचा प्रश्न समोर टाकला. " मम्मा शेगडीपण स्क्रूनीच जोडलेली असते का ?" आणि त्याने शेगडी वरचा एक स्क्रू मला दाखवला .. धोक्याची घंटा माझ्या डोक्यात ठन्न ठन्न करत होती .. जरासे चिडूनच मी त्याला म्हणाले 'तुला इथून पुढे कधीही हातात screw driver मिळणार नाही'. आणि कोणत्याही वस्तूला स्क्रू काढण्यासाठी मम्मा बाबाला विचारल्या शिवाय हात लावायचा नाही.
मग मी त्याला समजावून सांगायचा प्रयत्न केला कि कोणत्याही वस्तूचे भाग सुटे करण्यापूर्वी आई बाबांना विचारणे गरजेचे असते. अन्यथा काहीही धोकाहोऊ शकतो.
आवाजातले आणि एकूणच सगळे गांभीर्य लक्षात घेऊन आशयने लगेच तिथून काढता पाय घेतला खरा .. पण आम्हा दोघांना मात्र त्याची हि कृती काळजीचे कारण ठरली.