संध्याकाळची वेळ होती. मी स्वयंपाकाच्या तयारीला लागले होते. आशय माझ्या अवती भोवती घुटमळत होता. थोड्या वेळाने त्याला न राहवून त्याने मला प्रश्न विचारला, मम्मा हनुमान बाप्पाकडे गदा आणि राम बाप्पा कडे धनुष्य असे का ? जर उलट असले असते तर बरे झाले असते न .. माझी मतीच गुंग झाली .. किती विचार करतो हा मुलगा ??? (स्वाभाविकपणे प्रत्येक आईची हीच प्रतिक्रिया असते नाही का !!)
आता माझी वेळ होती अक्कल वापरून शक्कल लढवून त्याच्या प्रश्नाचे उत्तर द्यायची.
थोडा विचार करून मी त्याला म्हणाले कि 'बेटा हनुमान बाप्पा हवेत उडू शकत होता, लहान मोठा होऊ शकत होता न .. (Thanks to animated movies !!) म्हणून त्याच्याकडे गदा होती शिवाय तो खूप ताकदवान होता त्यामुळे जड गदा उचलू शकत होता आणि राम बाप्पाला राक्षसांना मारायचे असेल तर धनुष्य बाण वापरणे सोपे जायचे शिवाय बाण हवेत उडू शकतो त्यामुळे तो उडणाऱ्या राक्षसाला मारणे पण सोपे जायचे म्हणून ...
हुश्श .. पटले बाबा एकदाचे साहेबांना !!
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment