बऱ्याच दिवसांनी आम्हा तिघांच्या गप्पा जेवताना रंगात आल्या होत्या. जेवता जेवता आशय आम्हाला कोडी घालत होता. आशयची आत्या त्याच्या पुस्तकांना कव्हर घालत होती. तिने अमोलला आशयच्या 'स्कुल डायरी' लिहिण्याबद्दल आठवण करून दिली. त्यावरून गप्पा "रक्तगट" विषयावर आल्या.
अमोलने आशयला गांधीनगरची रक्तगटाच्या टेस्टची आठवण लक्षात आहे का ? विचारताच त्याने बोलणे सुरु केले. आशय म्हणाला,"हो बाबा ! आपण त्या लैबमध्ये गेलो होतो नि तू मला अचानक 'आशय तिकडे बघ ते काय आहे !' असे म्हणालास (हावभावासहित) अन मी बघेपर्यंत त्या काकांनी माझे रक्त काढले पण !!".
बाबाने पुढे विचारले "तुझा रक्तगट काय आहे आशय ?" (प्रश्न त्याची परीक्षा घेण्यासाठी होता, हे लक्षात न आल्याने) मी लगेच उत्तरले "AB+ve" . तात्काळ आशय चिडून म्हणाला," काय ग मम्मा ? मला उत्तर द्यायचे होते, तू का दिलेस ?"
मी सावरासावर करीत म्हणाले," अरे ! मी माझा रक्तगट सांगितला, तुझा नाही . (A) ए ! B+ve !" . लेकराने विश्वास ठेवला माझ्यावर नि म्हणाला," अच्छा ! तुझा B+ve आहे का ? माझा तर AB+ve आहे" . मी म्हणाले "बाबाचा पण !!" लगेच आत्या आशयला म्हणाली, " आशय, माझा पण !!"
अमोलने त्याच्या ज्ञानात भर घालण्यासाठी त्याला इतर माहिती सांगण्यास सुरुवात केली," तुला माहिती आहे का बाळा ? एकुण चार मुख्य रक्तगट आहेत आणि प्रत्येकाचे दोन उपगट, +ve आणि -ve, असे एकुण आठ ! सगळी माणसे यापैकीच कोणत्या ना कोणत्या रक्तगटाची असतात. त्यातही O -ve हा रक्तगट फार कमी लोकांचा असतो".
अमोलचे सांगणे संपत नाही तोपर्यन्त आशयने विचारले," हा रक्तगट कसा काय ओळखतात ? आणि कोण सांगतं की तुमचा 'हा' रक्तगट आहे आणि तोच का असतो ?"
मी नि अमोल, दोघांनीही एकमेकांकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले. दोघांच्याही मनात एकच प्रश्न 'आता उत्तर काय द्यायचे ? कसे सांगायचे ?'. मी कौतुकाने आशयकड़े बघत अमोलला हसून म्हणाले,"द्या गोवंडे, उत्तर द्या !". यावर लगेच आशय अमोलला थांबण्याची खुण करत म्हणाला,"नाही गोवंडे तुम्ही थांबा ! (माझ्याकडे बघत) कुलकर्णी तुम्ही उत्तर द्या !!". (अमोल खदखदुन हसत होता).
मी मनातून हसून विचार करत आशयला बोलू लागले, (इकडे अमोलच्या हात गोल फिरवून लपेटल्याच्या खुणा करणे सुरु होते. शेवटी ते बघून हसत हसत त्याला थांबायला सांगत मी आशुला म्हणाले," बाळा त्यासाठीच आपल्याला blood test करावी लागते. मग आपल्याला कळते की आपला रक्तगट काय आहे ते !"
आशय - "हो ग मम्मा, पण तेच (हा मुख्य प्रश्न बरं का); त्या टेस्टने कसे कळते ?"
मी नि अमोल, दोघांनीही एकमेकांकडे बघितले, डोळ्यात एकच प्रश्न होता दोघांच्याही ! "किती मोठी पंचाईत ? कसे समजावयाचे आता हे सगळे ?"
थोडा विचार करून मी म्हणाले (तोपर्यंत आशय प्रश्नार्थक नजरेने मला न्याहाळतच होता) ,"जसे आपण एखादे झाड कशाचे आहे हे आपण त्याच्या पान, फुल अथवा फळावरून ओळखतो; तसेच रक्ताची टेस्ट केल्यावर कळु शकते तो कोणता रक्तगट आहे ते !". त्यावर लगेच आशय म्हणाला,"पण झाडाला असलेल्या फुलं नि फळांवरुन आपल्याला ते कळते नं ! मग रक्तगटाचे कसे ?" मी नि अमोल दोघेही उत्तरलो," असे थोडीच असते ? झाडांच्या पानांवरुनही आपण ओळखू शकतो नं ! जसे आंब्याचे झाड आपल्याला कधीही ओळखू येते, त्याच्या पानांवरून; पावसाळयात किंवा हिवाळयात, तेव्हा कुठे त्याला मोहर किंवा आंबे लागलेले असतात ? तसेच रक्तगटाचे देखील असते !!".
एवढ्या स्पष्टीकरणानंतर साहेबांना पटले की अशी काही टेस्ट / क्रिया असू शकेल की ज्यावरून आपण ओळखून सांगू शकू कुणाचा कोणता रक्तगट आहे हे !!.
Finally Aashy la kalale blood group Vishayi... :)
ReplyDeletegood tai ...you are genius ,,,, chan explain kartes tu .... !!
:) Thanks Snehal !
Delete